
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. 5 आक्टोंबर 2024 । फलटण । फलटण येथील प्रसिध्द असणार्या श्री दत्त भेळ सेंटरचे विश्वजित मठपती यांनी आपला वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केला. वाढदिवसाचे औचित्या साधून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या मुकबधीर विद्यालयामध्ये मुकबधीर मुलांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप केले. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर अनोखे हास्य यामुळे उपस्थितांना पहायला मिळाले.
यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालयाच्या प्राचार्या सौ. वैशाली शिंदे, सौ. हेमा गोडसे, युवानेते प्रितसिंह खानविलकर, अमर पिसाळ, प्रद्युम्न मठपती व तेजस मठपती यांनी प्रमुख उपस्थिती होती.


