गुणवरेच्या प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन साजरा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासात अग्रेसर असणारे गुणवरे येथील प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, संस्थेच्या संचालिका सौ.प्रियांका पवार यांनी महिला शिक्षकांना व प्रशालेच्या मावशींना शुभेच्छा दिल्या.

प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल अहिरे, प्रशालेचे पर्यवेक्षक किरण भोसले, समन्वयिका सौ.सुप्रिया सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

प्रशालेच्या सर्व महिला शिक्षिका व मावशींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी महिला शिक्षकांना व मावशींना स्वतः तयार केलेल्या रंगीबेरंगी पर्यावरण पूरक कागदी पिशव्या भेट दिल्या त्यातून आली आली प्लॅस्टिक बंदी, स्वच्छतेची नवी संधी, मनी रूजवू महत्त्व बंदीचे वापरात आणू पेपर रद्दीचे हा संदेश देण्यात आला.

महिला शिक्षिकांसाठी विविध स्पर्धा घेऊन महिलांचा कौतुकसोहळा साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. अश्विनी भोइटे व सौ.स्वाती नाळे यांनी केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!