पश्चिम बंगालमध्ये सीबीआयच्या धाडी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य,कोलकाता, दि. २६:  पश्‍चिम बंगालमध्ये कोलकातासह 15 ठिकाणी कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार आहे. त्यामुळे सीबीआय-ईडीकडून विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. जे व्यापारी कोळसा आणि पशु तस्करीशी संबंधित आहेत, त्यांच्या ठिकाणांवर या धाडी टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पश्‍चिम बंगालमधील ही ईडीची दुसरी कारवाई असून या पुर्वीच्या कार्यवाहीत सीबीआय-ईडीला मोठ्या प्रमाणात धागे दोरे हाती लागल्यानेच परत एकदा सीबीआय-ईडीकडून ही कार्यवाही केली जात आहे.

दुर्गापुर, कोलकाता, पुरुलियासह 15 विविध ठिकाणी आरोपींना अटक करुन सीबीआय-ईडीच्या धाडी सुरु आहेत. अटक करण्यात आलेल्यांची सखोल चौकशी सुरू असून त्यातून या तस्करीच्या म्होरक्‍यापर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा व तृणमूल कॉंग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे या प्रकरणात नाव घेण्यात येते आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांची पत्नी आणि तिच्या बहिणीची चौकशी करण्यात आली आहे. कथित तस्करीतील रक्कम थायलंडच्या एका बॅंकेच नियमितपणे जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अभिषेक यांच्या पत्नीकडे थायलंडचाही पासपोर्ट असल्याची माहिती आहे.

Back to top button
Don`t copy text!