दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२४ | बारामती |
तुम्ही दहावीची परीक्षा दिलीय, नववीतून दहावीत जाणार आहात… पुढे काय करायचं?… करिअरच्या संधी काय आहेत?… उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे?… या तत्सम प्रश्नांची उत्तरे हवी असतील आणि त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बारामतीत २३ मार्च रोजी मिळतील.
येत्या २३ मार्च रोजी विद्यार्थी व पालकांसाठी सकाळ विद्या व कोटाची मोशन अकॅडमी यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सिटी इन चौकातील ‘मुक्ताई लॉन्स’ येथे २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
दहावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे, कोणती विद्या शाखा निवडायची, इंजिनिअरिंग की मेडिकलला जायचे, याबाबत शंकानिरसनासाठी ‘सकाळ विद्या’ आणि कोटाची ‘मोशन अकॅडमी’ यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ या विषयावर मोशन अकॅडमीचे संचालक डॉ. नीरज कुमार मार्गदर्शन करणार आहेत.
काय ? – कधी ? केव्हा ? कुठे ?…….
काय ? – दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन
कधी ? – शनिवार, २३ मार्च २०२४
केव्हा ? – सकाळी १० वाजता
कुठे ? – मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, सूर्यनगरी, भिगवणरोड, बारामती.
प्रवेश – विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य
आजच आपली जागा निश्चित करा व क्यूआर कोड स्कॅन करा.
संपर्क – ८९७५६७३३१०