साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२२ । सातारा । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम  12 पोटजातीतील ( मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत भागभांडवली अंशदानाचे  निधीतून थेट कर्ज योजनेअंतर्गत  महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक व आर्थिक उद्दिष्टासाठी कर्ज मागणी अर्ज  मिळण्याची व स्विकारण्याचा दि. 28 नोव्हेंबर  ते 20 डिसेंबर पर्यंत आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सातारा  (02162-298114)  येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!