विभागीय अबॅकस स्पर्धेत ब्लूम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश; गुणवंतांवर कौतुकाचा वर्षाव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

विभागीय अबॅकस स्पर्धेत ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल, गुणवरेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विविध गटांत पारितोषिके पटकावली आहेत.

स्थैर्य, फलटण, दि. ०३ सप्टेंबर : निंबळक येथे आयोजित विभागीय अबॅकस स्पर्धेत ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गुणवरेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी कठीण गणितीय उदाहरणे अत्यंत कमी वेळात अचूकपणे सोडवून उपस्थितांची दाद मिळवली.

स्पर्धेतील विजेते विद्यार्थी

या स्पर्धेत पहिल्या इयत्तेतील विरेन पवार (रँक १), दुसऱ्या इयत्तेतील सर्वेश यादव (रँक १) व देवांश भरणे (रँक ३), तिसऱ्या इयत्तेतील वरद नाळे (रँक १), अंशुल पवार (रँक २) व रुद्रांश जेधे (रँक ३) यांनी यश मिळवले. तसेच चौथ्या इयत्तेतील दिव्यांका दोशी (रँक १), सहावीतील सम्यक दोशी (रँक १), आठवीतील सई निंबाळकर (रँक १) आणि नववीतील मुस्कान डांगे (रँक १) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उद्योजक राम निंबाळकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले.

मार्गदर्शन आणि अभिनंदन

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ईश्वर कृपा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संभाजी गावडे आणि सेक्रेटरी साधनाताई गावडे यांनी कौतुक केले. या यशात अबॅकस शिक्षिका सोनाली गौंड यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक गिरीधर गावडे, उपमुख्याध्यापिका पुनम जाधव आणि व्यवस्थापिका सोनाली मोरे यांच्यासह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!