पाटखळ येथे घरफोडी, १. १७ लाखांचा ऐवज चोरीस


दैनिक स्थैर्य । दि.२३ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यातील पाटखळ येथे शनिवारी सकाळी साडेअकरा ते सायंकाळी सव्वासहा या वेळेत १.१७ लाखांची घरफोडी झाली. याबाबत तक्रार दीपक राजेंद्र जाधव (वय २९, रा. पाटखळ, ता. सातारा) या युवकाने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दीपक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पाटखळ येथील घर रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत पंधरा हजारांची रोकड, ७0 हजरांचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, १५ हजारांची चार ग्रॅम वजनाची ठुसी, १७ हजारांची अर्ध्या तोळ्याची अंगठी असा १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अज्ञातावर गुर्नंहा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!