निंबाळकर सरांच्या आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

बैलगाडा मालक स्व. रणजीत निंबाळकर यांच्या पत्नीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्त; आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. 02 जुलै 2024 | मुंबई | पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करून या सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र निंबाळकर यांच्या उर्वरित कुटूंबाचा भवितव्याचा विचार करून ही मदत त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या मदतीचा धनादेश निंबाळकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील हेदेखील उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!