
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फरांदवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत फलटण- सातारा रस्त्यावर आशिर्वाद मंगल कार्यालयापुढे दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास बुलेट मोटारसायकलने (क्र.एमएच-११-सीयू-६६५०) दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीचालक मोहन बापू कर्णे (वय ७२, रा. फरांदवाडी, ता. फलटण) हे व बुलेटचालक असे दोघेजण जखमी झाले. अपघातानंतर बुलेटचालक फरार झाला.
या अपघाताची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली असून बुलेटचालक सचिन शेळके, रा. वाठार निंबाळकर, ता. फलटण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पो.हवा. नाना होले करत आहेत.
