म. फुले यांच्या विचाराच्या शहर व तालुक्यातील बांधवांनी पुष्पहार घालुन अभिवादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि.२८ : थोर समाज सुधारक म. फुले यांच्या 130 व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील त्यांच्या पुतळ्यास आ. दिपकराव चव्हाण, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि म. फुले यांच्या विचाराच्या शहर व तालुक्यातील बांधवांनी पुष्पहार घालुन अभिवादन केले. 

आ. दिपकराव चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. महादेवराव जानकर, नगराध्यक्षा सौ. निताताई मिलिंद नेवसे यांनी म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम गायकवाड यांनी घोषणा देत म. फुले यांच्या विषयी आदराची भावना व्यक्त केली. 

श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, समता परिषद व माळी समाज महासंघाचे दशरथ फुले, प्रा. संपतराव शिंदे, मिलिंद नेवसे, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, प्रा. शिवलाल गावडे, प्रा. वसंतराव अडसुळ, बाळासाहेब ननावरे, एम.के. भुजबळ, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, पंचायत समिती माजी सदस्य विवेक शिंदे, अमीरभाई शेख, दिपक शिंदे, अ‍ॅड. राहुल कर्णे, गुलाबराव दडस, बापूराव काशिद, हणमंत शिरनामे, संदिप नाळे, सावता बनकर वगैरेंनी म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. ओबीसी जनमोर्चाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. 

दरम्यान नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, जिल्हा सचिवा सौ. मुक्ती शहा, डॉ. प्रविण आगवणे, व्यापारी आघाडी उपाध्यक्ष राहुल शहा, कल्पनाताई गिड्डे, रवी फडतरे, विरोधी पक्ष गट नेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, सौ. उषा राऊत, भाजपा शहराध्यक्षा अमोल सस्ते, उपाध्यक्ष किरण राऊत, निलेश चिंचकर, तानाजी करळे, शहर सचिव ज्योतीराम घनवट, सचिव मिलिंद भोसले, किसान मोर्चा अध्यक्ष नितीन वाघ, उपाध्यक्ष शशिकांत रणवरे, राजकुमार देशमाने, अजित गायकवाड, प्रकाश काकडे यांच्यासह अन्य मान्यवरांनी म. फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!