देशात ब्रिटनच्या कोवीशील्डला पुढच्या आठवड्यात मिळू शकते मंजूरी; याला अप्रुव्ह करणारा पहिला देश असणार भारत


 

स्थैर्य, दि.२३: कोरोना व्हॅक्सीनवर लवकरच
चांगले वृत्त येण्याचे आशा आहे. ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची व्हॅक्सीन
कोवीशील्डच्या भारतात इमरजेंसी वापरासाठी पुढच्या आठवड्यात मंजूरी मिळू
शकते. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या सूत्रांनुसार सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ
इंडिया (SII) कडून अजून काही डेटा मागवला होता. जो कंपनीने प्रोव्हाइड केला
आहे. भारतात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या व्हॅक्सीनची मॅन्युफॅक्चरिंग SII
करत आहे.

फायझर, भारत बायोटेक लस लवकरच मंजूर होणार आहे

अ‍ॅस्ट्रॅजेनेका
या ब्रिटीश कंपनीला मान्यता देणारा भारत पहिला देश होऊ शकतो. ब्रिटनमध्ये
सध्या त्याचा चाचणी डेटा तपासला जात आहे. लस बनवण्यामध्ये भारत जगातील
सर्वात मोठा देश आहे. जानेवारीपासून देशातील जनतेला कोरोना लस देण्यास
सुरूवात व्हावी अशी सरकारची इच्छा आहे. यासाठी फायझर आणि भारत बायोटेक
लसीच्या आपत्कालीन वापरास लवकरच मान्यता दिली जाऊ शकते.

मोदी म्हणाले होते- काही आठवड्यात ही लस तयार होईल

पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर 4 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती.
बैठकीनंतर ते म्हणाले होते की काही आठवड्यात कोरोनाची लस तयार होईल, आजारी
वृद्ध आणि आरोग्य कामगारांना पहिली लस लागू होईल. यापूर्वी 28 नोव्हेंबरला
मोदींनी सीरम इन्स्टिट्यूटसह देशात लस तयार करणार्‍या तीन कंपन्यांच्या
फॅसिलिटीचा दौराही केला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!