
स्थैर्य, सातारा, दि.२०: नागठाणे (प्रतिनिधी )काशीळ (ता.सातारा) येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून बोरगाव पोलिसांनी दुचाकी ,मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा सुमारे ४४,१४० रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी फिरोज महंमद शेख (वय. ५५), अविनाश युवराज कांबळे (वय. ४१), हुसेन दिलावर कागदी (वय. ३४) सुभाष संपत कोळेकर (वय. ४५), चंद्रकांत तात्याबा कोळेकर (वय.५०,सर्व रा.काशीळ ता.सातारा) तसेच राजेंद्र मनोहर सुतार (वय ४१, रा.शिरगाव ता.कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काशीळ गावचे हद्दीतील यशवंत हायस्कुलच्या परिसरातील मोकळ्या जागेत काही लोक तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती बोरगाव पोलीस स्टेशनचे सपोनि डॉ. सागर वाघ यांना मिळाली. त्यावेळी सपोनि डॉ.सागर वाघ यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर सुर्वे, किरण माने, राहुल भोये,प्रकाश वाघ आणि टोणे यांनी तेथे छापा मारून जुगार खेळत असलेल्या लोकांना ताब्यात घेतले.त्यांच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.