तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ब्लूम इंग्लिशच्या धनाजी माळशिकारेचे यश


दैनिक स्थैर्य। दि. २६ नोव्हेंबर २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये गुणवरे, ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाच्या इयत्ता आठवीतील प्रणव धनाजी माळशिकारे या विद्यार्थ्याने 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याने केवळ तीस सेकंदातच प्रतिस्पर्ध्यावर मात करून प्रेक्षकांची मने जिंकली.

धनाजी माळशिकारे याला शाळेचे प्राचार्य पै. गिरीधर गावडे यांनी मार्गदर्शन लाभले. शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने खेळालाही महत्व दिले जाते. विद्यार्थ्यांच्याकडून खेळाचे नियमित सराव करून घेतल्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

या यशाबद्दल शाळेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, अध्यक्ष श्री ईश्वर गावडे, आरटीओ इन्स्पेक्टर श्री संभाजीराव गावडे, प्राचार्य श्री गिरीधर गावडे, शिक्षक, शिक्षिका, पालक यांनी त्याचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!