ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय अबॅकस व वेदिक मॅथ्स् परीक्षेत यश


दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
उत्कर्ष क्रिएशन राज्यस्तरीय अबॅकस व वेदिक मॅथ्स् परीक्षेमध्ये गुणवरे येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले.

या यशाबद्दल विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अकलूज उपप्रादेशिक विभागाचे वाहन निरीक्षक श्री. संभाजीराव गावडे यांनी शाळेने दिलेल्या सुविधांचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वतःचे, आई-वडिलांचे, गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे, प्राचार्य गिरधर गावडे, उत्कर्ष क्रिएशन्सचे संस्थापक श्री. अमित शिंदे, संचालिका सौ. संध्या शिंदे, परीक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे, अध्यक्ष श्री. ईश्वर गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावर होणार्‍या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

उत्कर्ष क्रिएशन राज्यस्तरीय अबॅकस व वेदिक मॅथ्स परीक्षेमध्ये १४ विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, १४ विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल व ४ विद्यार्थ्यांना ब्राँझ मेडल व सर्वांना प्रशस्तीपत्रक प्रमुख अतिथी श्री. संभाजीराव गावडे व संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

या सर्व विद्यार्थ्यांना विद्या भोसले या शिक्षिकेने मार्गदर्शन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!