
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२३ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत जयपुर ता. कोरेगाव येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबीराच्या प्रांरभी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.बी. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले. या प्रसंगी सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीशकुमार पोरवाल यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जीवनचरीत्रावर मार्गदर्शन, कथाकथन, नृत्य, गायन, व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
