स्थैर्य, फलटण, दि १: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने घरोघरी फिरून ट्रॅकटर ट्रोली द्वारे बाप्पांच्या मूर्तींचे एकत्रित संकलन करण्यात येऊन त्यांचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरामध्ये गणेशमूर्तींचे संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. संकलन केंद्रे श्रीराम मंदिराजवळील श्रीराम पोलिस चौकीसमोर, उम्ब्रेश्वर चौक मलठण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने डी.एड. कॉलेज चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, गजानन चौक येथे असणार आहेत.
घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन, यश्व्न्तराव चव्हाण हायस्कूल, स्वामी विवेकानंद नगर येथील कासारबावडी या ठिकाणी कृत्रिम तळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यावर्षी जिंती नका येथील पुलावरही विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. पंढरपूर पूल येथे गणेशमूर्ती विसर्जनाकरिता क्रेनची सोय करण्यात येणार आहे.
अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत पालिकेच्या वतीने ट्रॅकटर ट्रोली द्वारे शहरात फिरून देखील मूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे.