स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देताय, आपले काय ते बोला; शिवसेनेने केंद्र सरकारला सुनावले

Team Sthairya by Team Sthairya
December 19, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: ‘चीनने हिंदुस्थानात घुसून
आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत चर्चा, ना संरक्षण
खात्याच्या स्थायी समितीत चर्चा. चीनच्या घुसखोरीवर चर्चा करा असे
सांगण्यात आले तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी? तर लष्कर,
हवाई दल आणि नौदलातील जवानांचे गणवेश बदलण्यावर चर्चा झाली.’ असे म्हणत
शिवसेनेने सामनामधून केंद्र सरकारला सुनावले आहे. नेपाळला चीनपासून सावध
राहण्याचा इशारा देताय, पण आपले काय ते बोला असेही शिवसेनेने म्हटले आहे.

‘भाजपचे
खासदार ना शेतकरी आंदोलनावर बोलत आहेत ना चीनच्या घुसखोरीवर बोलत आहेत. पण
आमचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत
आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. नेपाळ
हातचा गेलाच आहे. लडाखमध्ये चिनी घुसले आहेत. त्यांना कसे बाहेर ढकलणार ते
सांगा. ते जास्त महत्त्वाचे आहे!’ असे म्हणत शिवसेनेने बिपीन रावत यांनाही
सुनावले आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत राहिले

ऐकावे
ते नवलच असे सध्या आपल्या देशात घडत आहे. चीनपासून सावध राहा, असा इशारा
हिंदुस्थानने म्हणे नेपाळला दिला आहे. आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन
रावत यांनी सांगितले आहे, नेपाळने आशियातील श्रीलंकेसह अन्य देशांकडून
शिकायला हवे आणि चीनपासून सावध राहायला हवे! श्रीमान रावतसाहेबांचा सल्ला
चांगला आहे, पण नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळचा घास
गिळला जात असताना हिंदुस्थानचे सरकार तेव्हा हा प्रकार षंढासारखे बघत
राहिले.

नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?

नेपाळ
हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम व सीतामाईंशी नात्याने
जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?
नेपाळात जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबीत
हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघडय़ा डोळय़ाने सहन
केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा?

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे?

आज
चीन हिंदुस्थानपेक्षा नेपाळच्या जवळ जास्त आहे. चीनने नेपाळची संस्कृती
बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक
नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबले
आहे. नेपाळी जनतेला गुलाम केले आहे. चीन सातत्याने आपले सैन्य आणि आर्थिक
ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. चीन अब्जावधी रुपयांचे पायाभूत
सुविधांचे प्रकल्प हिमालयन रिजनमध्ये उभारण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान, नेपाळ, मालदिवसारखी राष्ट्रे चीनच्या पकडीत आहेत. श्रीलंकेतही
चीनने मोठी गुंतवणूक केलीच आहे. लडाखमध्ये चिनी सैन्य आज आतमध्ये घुसले
आहे. त्यानंतर चीनच्या गुंतवणुकीचे काय करावे? हा प्रश्न निर्माण झाला.

चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे?

लडाख
प्रकरण घडले नसते तर चीनचे अब्जावधी रुपये आपल्या देशात आलेच होते व
त्याचे परकीय गुंतवणुकीचे कौतुक करताना मोदी सरकार थकत नव्हते. चीनचे
पंतप्रधान हिंदुस्थान दौऱयावर आले व दिल्लीत न उतरता थेट मोदींच्या गावात
अहमदाबादेत जाऊन झोपाळय़ावर झुलू लागले. तेथे त्यांनी शेव पापडी, गाठे,
ढोकळा खाल्ला. त्या वेळी आम्ही याच स्तंभातून इशारा दिला होता-चीनपासून
सावध राहा! ते खरेच ठरले. डोकलामपासून लडाखपर्यंत चीनने धोकाच दिला आहे.
अरुणाचलमध्ये घुसखोरी सुरूच आहे व लडाखमध्ये घुसून चिनी सैन्याने आमची जमीन
ताब्यात घेतली आहे. त्यामुळे चीनपासून नक्की सावध कोणी राहायचे?

हा मूर्खपणाचा कळस आहे

चीनने
हिंदुस्थानात घुसून आमच्या भूभागावर अतिक्रमण केले. त्यावर ना संसदेत
चर्चा, ना संरक्षण खात्याच्या स्थायी समितीत चर्चा. चीनच्या घुसखोरीवर
चर्चा करा असे सांगण्यात आले तेव्हा समितीत चर्चा कोणत्या विषयांवर व्हावी?
तर लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांचे गणवेश बदलण्यावर चर्चा झाली.
हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्य दलास अमेरिकन स्टाईलचे ड्रेस द्यावेत अशी
मागणी भाजपचे खासदार सध्या करीत आहेत. हा मूर्खपणाचा कळस आहे. कश्मीर
खोऱयात रोज दोन-चार जवानांना हौतात्म्य का पत्करावे लागत आहे त्यावर चर्चा
करा म्हटले की हे लोक पळ काढतात. जवानांच्या ड्रेस कोडवर चर्चेचे गुऱ्हाळ
घालणारे हे लोक चीन आमच्या हद्दीत घुसले आहे त्यावर चर्चा करायला तयार
नाहीत.

Related


Tags: देश
Previous Post

मुंबईत बँक मॅनेजरची हत्या : पत्नीच्या विरोधात अश्लील टीप्पणी, पतीने केली हत्या

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपशी आघाडी नकाे, राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश

Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपशी आघाडी नकाे, राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!