स्थैर्य, दि.११: नवीन कृषी कायद्याविरोधात
शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून भाजपने सलोख्याची तयारी केली आहे. पक्षाने
शेतकऱ्यांना या कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी मोठे अभियान चालवण्याची
तयारी केली आहे. याअंतर्गत चावडी आणि पत्रकार परिषदा घेतल्या जातील. तसेच,
शेतकऱ्यांना भेटून त्यांच्याशी थेट संवाद साधला जाईल. हे अभियान देशातील
प्रत्येक जिल्ह्यात राबवले जाणार.
कृषी
कायदे परत घेण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांचे दिल्ली सीमेवर 16
दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळात आंदोलन तीव्र
करण्याचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी त्यांनी
हायवे बंद करण्याची घोषणा देखील केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये,
यासाठीच भाजपने हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना कायद्याचे फायदे सांगणार…
भाजप
नेते सतत म्हणत आहेत की, कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये चुकीची माहिती
पसरवली जात आहे. परंतू, आता कायद्यांबाबत योग्य माहिती देण्यासाठी भाजप
येणाऱ्या काळात 700 पत्रकार परिषदा आणि शेकडो चौपाल लावणार आहे. याशिवाय,
भाजप नेते आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांना भेटून या नवीन कायद्याची माहिती
सांगतील. भाजपचे जनरल सेक्रेटरी बीएल संतोष यांनी गुरुवारी राज्यांचे
प्रभारी आणि अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे याबाबत चर्चा केली.