आयपीएस अधिका-याला लाचप्रकरणी अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, जोधपूर, दि.११: राजस्थानात एक
विचित्र प्रकरण समोर आलं आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्त
भाषण दिल्यानंतर पोलीस उप-अधीक्षकाला लाच घेतल्याच्या आरोपांखाली अटक
करण्यात आली. माधोपूर येथे अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) कार्यालयात
आंतरारष्ट्रीय दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात डीएसपी मीणा हे प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करताना ते
म्हणाले, ‘आपल्याला संपूर्ण प्रामाणिकपणे भारताला भ्रष्टाचारापासून मुक्त
करायचं आहे. केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कर्मचा-याने लाच
मागितली तर १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा,’ असं आवाहनही
त्यांनी केलं होतं.

विशेष म्हणजे या भाषणाच्या एक तासानंतर
डीएसपी मीणा यांना ८० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
तसेच त्यांना लाच देणा-या जिल्हा परिवहन अधिका-यालाही अटक झाली. एसीबीच्या
कार्यालयात असलेल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-याला खुद्द एसीबीनंच जाळ्यात
अडकवल्याचं उदाहरण पहिल्यांदाच पहायला मिळालं आहे. एसीबीला अनेक
प्रयत्नांनंतर डीएसपी मीणा यांच्याविरोधात पुरावे मिळाले होते. या
पुराव्यांच्या आधारे एसीबीची टीम आणखी काही अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल
करु शकते.

एसीबीचे महासंचालक बीएल जोशी यांनी
सांगितलं की, ‘कोटा येथील आकाशवाणी कॉलनीत राहणा-या डीएसपी भैरुलाल मीणा जे
सवाई माधोपूरमधील एसबी पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. त्यांच्याविरोधात
अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. एसबी चौकात अधिका-यांना बोलावून ते
पैसे घेत असतं. त्यामुळे एसीबीची टीम सातत्याने त्यांच्यावर लक्ष ठेवून
होती.’


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!