भाजप आमदार संजय सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर, वाढदिवसाच्या जाहिरातीतून दिले संकेत


 


स्थैर्य, दि.१३: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी
कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ भुसावळचे भाजप आमदार संजय
सावकारे हे देखील राष्ट्रवादीच्या वाटेवर असून वाढदिवसाच्या जाहीरातीतून
त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आमदार
संजय सावकारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भुसावळ शहरात ठिकठिकाणी
लावण्यात आलेल्या फलकावरुन भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे वगळण्यात आली
आहेत. सोशल मीडियावरील अनेक जाहिरातींमध्ये भाजप नेत्यांऐवजी राष्ट्रवादीचे
नेते एकनाथ खडसे, रोहीणी खडसे यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. तर
काही फलकांवर खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांचे
छायाचित्र झळकत असून गिरीश महाजन यांना जाहिरातींमधून वगळण्यात आले आहे.

त्यामुळे सावकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

एकनाथ
खडसे यांनी दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर
त्यांच्या अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.अशातच आमदार
सावकारे यांनी उघडपणे आपण खडसेंसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपसाठी हा
मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!