भाजपा महिला मोर्चाकडून १३ फेब्रुवारीला हळदी-कुंकू व होम मिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
गणेश जयंतीनिमित्तभारतीय जनता पार्टी महिला मोर्चा व शुक्रवार पेठ तालीम मंडळ, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ तसेच होम मिनीस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम, संगीत खुर्ची, लकी ड्रॉ, उखाणे स्पर्धा व तळ्यात-मळ्यात असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हे कार्यक्रम शुक्रवार पेठ तालीम, गणपती मंदिरासमोर, ता. फलटण येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे व लकी ड्रॉ कूपन भेट मिळणार आहे.

दरम्यान, बुधवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.०० वाजता महाप्रसादाचेही वाटप करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व अ‍ॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

Back to top button
Don`t copy text!