दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
राज्याच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज फलटण येथे आली असता भाजपाच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पंकजा मुंडे या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी अल्पकाळ थांबल्या होत्या, त्यावेळी त्यांचे स्वागत नाईक निंबाळकर कुटुंबीयांनी केले. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.