सांगवी येथे उद्यानकन्यांद्वारे जनावरांचे आरोग्य तपासणी शिबीर


दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत उद्यानकन्यांद्वारे २९ ऑगस्ट २०२३ रोजी सांगवी (ता. फलटण) येथे जनावरांचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

या शिबिरास पशूवैद्य श्री. मदन गाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिराअंतर्गत गावातील १० ते १२ शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची आरोग्य तपासणी करून घेतली. तसेच संभावित आजार सापडलेल्या जनावरांवर पशूवैद्य मदन गाडे यांनी योग्य उपचार केला. या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. संतोष मोरे व इतर गावकरी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या सायली म्हस्के, शिवांजली माने, पूनम राऊत, सई झगडे, सोनाली कदम, सुप्रिया ठोंबरे यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.


Back to top button
Don`t copy text!