दैनिक स्थैर्य | दि. २१ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मधुर मिलन मंगल कार्यालय, नातेपुते, ता. माळशिरस येथे कार्यकर्ता स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी माजी मंत्री श्री. सदाभाऊ खोत, मा. आ. श्रीकांत भारतीय, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे, आ. शहाजीबापू पाटील, मा. आमदार प्रशांत परिचारक, मा. आ. रामभाऊ सातपुते, मा. आ. दिपक साळुंखे पाटील, मा. आ. जयवंतराव जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
भाजपा व मित्रपक्षांचे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा आघाडी पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, भाजप कार्यकर्ते यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.