
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 10 जुलै 2024 | फलटण | फलटण येथून आज सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बरड कडे मार्गस्थ झाला आहे. मार्गस्थ झाल्यानंतर लगेचच फलटण नगरपरिषद व काही सामाजिक संस्थांनी फलटण पालखी तळाची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नंतरचा त्रास व साथीच्या आजारांपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
फलटण पालखी तळावर प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या नियोजनानुसार अचूक असे कामकाज सुरू आहे. यामध्ये फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह फलटण तालुक्यातील प्रमुख अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहेत.
