बिग बॉस मराठीची फायनलिस्ट सई लोकूरने तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली


 

स्थैर्य, दि ३०: आगामी काळात आणखीन काही सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकणार आहेत. आपल्या जोडीदारासह अनके कलाकारा जीवनाची नवी इनिंग सुरू करणार आहेत. २०२० सांगताही सनई चौघडेनं झाली आहे. कारण आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री सई लोकुरही आता लग्नबंधनात अडकली आहे. 

नववधूच्या रुपात पाहून कुटुंबियांसह तिच्या मित्र मैत्रिणींच्याही आनंदाला पारावार राहिला नाही. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया तिच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहे. 

पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला, हे लग्न दोन पद्धतीने पार पडलं. मराठमोळ्या आणि बंगली पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पाहून चाहत्यांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळत आहे. या नवदाम्पत्यला नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा..

सई लोकुर सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो.

लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची पुढील वाटचाल सुरू होते. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसले लग्नानंतर सईचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ती खूप उत्सुकही आहे.

आपल्या जीवनातील या खास क्षणाला संस्मरणीय करायचे सईनेही ठरवले होते. त्यानुसार आपल्या जोडीदारासह काही खास क्षण कॅमे-यात कैद करुन प्री-वेडिंग फोटोही केले होते. यावेळी दोघांचा रोमँटीक अंदाज घायाळ करणारा असाच होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!