स्थैर्य, सातारा, दि.२५ : लॉकडाउन काळात वाहनांअभावी कित्येकांना मोठी पायपीट करावी लागली. ये- जा करताना कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागले. अशांच्या मदतीसाठी पुण्यातील “परिवर्तन’ ही सामाजिक संस्था धावून आली आहे. या संस्थेतर्फे जिल्ह्यातील 30 जणांना मोफत वाटप करण्यात आले.
परिवर्तन ही पुण्यातील सामाजिक संस्था. गेले दहा वर्षे संस्थेने शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेले आहे. विशेषतः संस्थेच्या परिवर्तन सायकल अभियानातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ बनले आहे. आजवर संस्थेने एक कोटी दहा लाख रुपये किमतीच्या नव्या आणि जुन्या सायकलींचे वाटप केले आहे. “परिवर्तन सायकल बॅंक’या योजनेतून पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ अन् पैसे वाचावेत, या हेतूनेही सायकलींचे वाटप केले आहे.
संस्थेचे सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रभावी अन् परिणामकारक काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेकडून कंपनी कामगार वा उपजीविकेसाठी पायी जाणाऱ्या 30 जणांना नवीन सायकलींची भेट देण्यात आली.
मनमोहक रुपात सिद्धनाथ-माता जोगेश्वरी; विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने भाविकांची इच्छा पुरी!
भारत स्काउट गाइड कार्यालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला. आमदार महेश शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, सासवडच्या जगताप फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष जगताप, संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब देडगे, समन्वयक किशोर ढगे, भुजंगराव जाधव, सचिन जगताप, कविता चौगुले, विभा साबळे आदींची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमात बोलताना आमदार शिंदे यांनी संस्थेच्या या आगळ्या सामाजिक संवेदनशीलतेचे कौतुक केले. संस्थेस आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागांतील 30 गरीब, होतकरू व्यक्तींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. अरुणा बर्गे यांचा कोरोनाजन्य काळात सेवाभावी वृत्तीने केलेल्या कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार सुनील शेडगे यांचाही संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान