विठुमाऊलीची सेवा करणाऱ्या दाम्पत्याला मिळाला कार्तिक एकादशीच्या महापूजेचा मान


 

स्थैर्य, पंढरपूर, दि.२५: विठ्ठल मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून विणेकरी म्हणून पहारा देणारे कवडुजी नारायण भोयर (वय- 64 ) व त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर (वय-55) या दाम्पत्याला कार्तिकी एकादशीच्या महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाणार आहे. शासकीय महापूजे वेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून भोयर दाम्पत्य उपस्थित राहणार आहे.

नारायण भोयर हे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देतात. विठ्ठल मंदिरातील एकूण सहा वीणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून ही निवड आज करण्यात आली. भोयर दाम्पत्य हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. ते मागील 9 ते 10 वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील 8 महिन्यांपासून लाॅकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करत आहेत.

मनमोहक रुपात सिद्धनाथ-माता जोगेश्वरी; विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनाने भाविकांची इच्छा पुरी!

दरवर्षी शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी श्रीच्या दर्शनरांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिरात 24 तास पहारा देणारे विणेकरी यांची मा.उपमुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

दुष्काळी माण तालुक्यात चिंचेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!