दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील बिबीचा परिसर धुक्यात हरवला आहे. पावसाळा संपल्यानंतर हिवाळा सुरू व्हायला जरा अवकाश आहे. तरीही मंद धुक्याला बिबी परिसरात सुरवात झाली आहे.
मंद धुक्यामुळे कांदा या पिकावर रोग पडण्याची दाट शक्यता असते, त्या रोगाचे नाव मुरगुटा असे आहे. ह्या रोगाची लागण धुक्या मुळेच होत असते, अशी माहिती संजय ज्योतीराम बोबडे ह्या शेतकऱ्याकडून समजले.
काल निळ्या रंगाने माकलेलं आकाश, आज तेच आकाश काळे रंगाने माखलेला आहे ह्या परिसरामध्ये दिवसभरात पाऊस पडण्याची दाट शक्यता गावकर्यांना वाटत आहे.