
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 15 मार्च 2024 | कोळकी | माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कोळकी गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे तरी कोळकी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन कामगार नेते बाळासाहेब काशीद, सतीश शेडगे, संदीप नवसे, रणजीत जाधव, ॲड. संदीप कांबळे यांनी केले आहे.
कोळकी येथील फुले, शाहू, आंबेडकर सामाजिक सभागृहामध्ये उद्या शनिवार दि. 16 मार्च रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
