फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मठाचीवाडी येथे गावभेट जनसंपर्क संवाद दौरा


दैनिक स्थैर्य | दि. १५ मार्च २०२४ | फलटण |
मठाचीवाडी, ता. फलटण येथे फलटण तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने गावभेट जनसंपर्क संवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रामुख्याने महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी सातारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्षा सौ. अल्पनाताई यादव यावेळी उपस्थित होत्या.

महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षित आहेत, यासाठी एकमेव पर्याय फक्त काँग्रेस आहे, हे या संवाद दौर्‍यात सांगण्यात आले.

यावेळी फलटण तालुका महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा म्हणून सौ. सुषमा उमेश शेलार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी फलटण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) भैय्या यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

दौर्‍यावेळी मठाचीवाडी गावचे भाजपचे शक्ती केंद्रप्रमुख श्री. शिवाजीराव भोसले तात्या, श्री. ज्ञानदेव भोसले भाजप बुथ प्रमुख, श्री. हणमंत जाधव बुथ प्रमुख, व्हा. चेअरमन, रामचंद्र सस्ते बुथ प्रमुख, श्री. धनाजी वाघ बुथ प्रमुख, ज्येष्ठ नेते व ग्रा. पं. सदस्य श्री. निवृत्ती जाधव तसेच बहुसंख्य भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


Back to top button
Don`t copy text!