
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. 11 आक्टोंबर 2024 । फलटण । येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आज शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी 9 वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर यांच्या पुतळ्याचा भूमीपूजन समारंभ माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती कृष्णाखोरे विकास महामंडळाचे नवनिर्वाचित संचालक माणिकराव सोनवलकर यांनी दिली.
सदर कार्यक्रमास फलटण शहर तसेच फलटण-कोरेगाव मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पुतळा समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
