📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि.१५ एप्रिल २०२२ । फलटण । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त निंभोरे ता. फलटण येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. कांचनताई निंबाळकर, उपसरपंच मुकुंदराव रणवरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र मदने यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश निंभोरे येथे ठेवण्यात आला असून अनेक आंबेडकर प्रेमी मंडळी तेथे जाऊन दर्शन घेतात व अभिवादन करतात. त्याच ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी आज भगवान गौतमबुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले.
फोटो ओळ :
