भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जोतिबा फुले जयंतीनिमित्त आज नेत्र तपासणी व भव्य रक्तदान शिबीर


दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२४ | फलटण |
लायन्स क्लब फलटण, लायन्स मुधोजी चॅरिटेबल हॉस्पिटल तसेच फलटण मेडिकल फाउंडेशन व लायन्स क्लब फलटण संचलित ब्लड बँक फलटण व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जोतिबा फुले जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आज आयोजित केले आहे.
रक्तदान शिबिर दि. ११ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन समाज मंदिर, मंगळवार पेठ, फलटण येथे हे शिबिर होणार असून आपल्या दृष्टीच्या आरोग्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा. या शिबिरात गरीब रुग्णांची मोफत व सर्वसामान्य रुग्णांची अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे व रक्तदान शिबिरास उपस्थित राहून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्य करण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!