क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त आज फलटणमध्ये भव्य बाईक रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. ११ एप्रिल २०२४ | फलटण |
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त फलटणमधील क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरात आज, ११ एप्रिल २०२४ रोजी भव्य बाईक रॅली व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ही बाईक रॅली फलटण शहरातील क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक येथून सुरू होऊन महात्मा गांधी चौक, राम मंदिर, पाचबत्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौक, बाणगंगा नदीपलीकडे, सावित्रीबाई फुले चौक, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन, मारवाड पेठ रोड, जैन मंदिर, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले चौक येथे समाप्त होईल. त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू होतील.

या जयंती उत्सवाची रूपरेषा अशी,

  • सकाळी ८ वाजता – महात्मा जोतिराव फुले यांना अभिवादन कार्यक्रम
  • सकाळी ८.३० वाजता – बाईक रॅली सुरू होईल.
  • सकाळी ११ वाजता – शासकीय सेवेमध्ये निवड झालेल्या समाजातील युवक-युवतींचा सत्कार
  • सकाळी ११ वाजता – अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधनपर कार्यक्रम होईल.
  • सायंकाळी ५ वाजता – भव्य मिरवणूक सोहळा सुरू होईल.

दरम्यान, जयंती उत्सवात सामील होणार्‍यांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत अल्पोउपहाराची सोय करण्यात आली आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व फुलेप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!