भाडळी गावाला पाहिजे सोनवलकरांचा सरपंच 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, दुधेबावी दि.१८: फलटण तालुक्यातील भाडळी खुर्द या गावाला गेली अनेक वर्षे सोनवलकर या आडनावाचा सरपंच नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. या गावात सोनवलकर आडनावाची लोक मोठ्या संख्येने एकत्र राहत आहेत मात्र ते शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय करत असल्याने राजकारण व निवडणूक यापासून ते लांबच राहिले आहेत. मात्र त्याचा परिणाम वेगळा झाला आहे की ग्रामपंचायत व सत्ता हातात नसल्याने कोणताही निर्णय त्यांना घेता येत नाही. 

तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून त्यामध्ये भाडळी खुर्दचाही समावेश आहे. या निवडणुकीत गावातील तरुण वर्ग उतरणार असून सत्ता ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी ठरवले आहे . याबाबतची मिटींगही घेण्यात आली आहे. तसेच याबाबत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा करून सत्ता तरुण पिढीच्या ताब्यात द्यायची असे मिटींगमध्ये ठरवण्यात आले असल्याचेही समजत आहे. सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाले नंतर सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!