रागाने बघितल्याचा कारणावरून एकाला मारहाण


दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । गाडी आडवी मारण्यावरून झालेल्या वादानंतर आमच्याकडे रागाने का पाहिलेस, असे म्हणत एका युवकाला मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रीतम अनिल चव्हाण (रा. गणेश कॉलनी, सातारा) याने दिलेल्या फिर्यादीवरून हृषिकेश हेमंत धोत्रे, अक्षय हेमंत धोत्रे (दोघे रा. देशमुख कॉलनी सातारा) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. 30 रोजी सकाळी फिर्यादी व संशयित यांच्यात गाडी एकमेकाला आडवी मारण्यावरून किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या रागातून संशयितांनी सायंकाळी क्रिडा संकुल परिसरातील एका रूग्णालयासमोर गाठून तू सकाळी गाडी आडवी मारली तेव्हा आमच्याकडे रागाने का पाहिलेस, असे म्हणत मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी संशयिताने फिर्यादीच्या डोक्यात फरशी घालून त्याला जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलिस गुरव या करत आहेत.

 


Back to top button
Don`t copy text!