
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. २० सप्टेंबर २०२१ । फलटण । मलवडी (ता.फलटण) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन मारहाण झाल्याची फिर्याद सुवर्णा महेंद्र गायकवाड (वय 45) या महिलेने दिली असून सदर फिर्यादीनुसार तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजणेचे सुमारास मौजे मलवडी (ता.फलटण) गावच्या हद्दीत सरकारी बिल्डींग येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन सौ.सुवर्णा महेंद्र गायकवाड यांना भूपती बाबूराव गायकवाड यांनी शिवीगाळ व दमदाटी करुन कपाळावर दगड फेकून मारुन दुखापत केली. लीना भूपती गायकवाड व प्रज्वल भूपती गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सौ.सुवर्णा गायकवाड यांनी दिली असून आरोपी लिना भुपती गायकवाड, प्रज्वल भुपती गायकवाड आणि भुपती बाबुराव गायकवाड या तिघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस नाईक टी.जी.काळेल करीत आहेत.
