स्थैर्य, फलटण, दि. २१ : गेल्या काही दिवसात कोरोनाच्या केसेस मध्ये एकदम वाढ झाली आहे. जी हॉस्पिटल्स ओस पडली होती तिथे परत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात ऍडमिट होताना दिसत आहेत. पण या वेळी दिलासा देणारी एकच गोष्ट आहे म्हणजे मृत्यू दर नक्कीच कमी आहे.
दुसरी लाट ही डिसेंबर मध्ये अपेक्षित होती. पण ती मार्च मध्ये म्हणजे ऐन उन्हाळ्यातच आली आहे. सुरवातीला लस घेण्याबद्दल एक उदासीनता होती. पण कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन आता तिथे लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. लस पण शॉर्ट झाले आहे. लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे. त्यांना दुसऱ्या डोसची वानवा दिसते आहे.
RTPCR आणि Rapid Antigen ह्या दोन टेस्ट सध्या कोरोना टेस्टिंग साठी वापरल्या जातात. लोड वाढल्यामुळे RTPCR चा रिपोर्ट मिळायला दोन दिवस लागत आहेत. Rapid Antigen चे false negative results जास्त येत आहेत. तर एकंदरीत सर्वच चित्र फारच अनिश्चित झाले आहे.
तर प्रियजनहो, आता हा कोरोना आपल्याबरोबर काही वर्षे राहणारच आहे असे दिसत असल्यामुळे आपण आलेल्या परिस्थितीला बदलू शकणार नाही, म्हणूनच आपल्याला बदलावे लागेल.
आपण काय बदल करू शकतो
कोरोना लस घ्या
मिळेल तेव्हा मिळेल तिथे कोरोना चे लस घ्या. कारण तेवढी एकच ढाल आता आपल्या हातात उरली आहे.
आपली प्रतिकार शक्ती वाढवा
रोज नित्यनियमाने अर्धा तास व्यायाम मग ते चालणे असो, योगासने असो, सूर्यनमस्कार असो, पळणे किंवा सायकलिंग असो जरूर केले पाहिजे. आणि हो किती दिवस करू हा प्रश्न न विचारता आयुष्यभर करा कारण त्यांनी आपलेच आरोग्य उत्तम राहणार आहे.
प्राणायाम हा प्रत्येकांनी रोज १५ मिनिटे करायलाच पाहिजे. दीर्घ श्वसन, अनुलोम्ब -विलोम्ब, कपालभाती , उज्जई , भ्रमारी प्राणायाम असे करण्यासारखे बरेच प्रकार आहेत.
बीज मंत्र की जी आपल्या ६ चक्रांना जागृत करून आपल्या शरीराच्या सर्व संस्था उत्तम ठेवतात, ते रोज म्हटले तर अति-उत्तम.
ऊँ-कार हे प्रतिकार शक्ती आणि आपला औरा वाढवण्याचे एक प्रभावी साधन आहे.
सकस पण मोजकाच आहार घ्या
घरी शिजवलेले अन्न खाणे जास्त महत्वाचे. बाहेरचे अन्न सध्या काही काळ वर्ज केलेलेच बरे. अन्नामध्ये प्रथिनांचा वापर जास्त असावा की ज्यांनी आपले स्नायू बळकट होतात. आणि प्रतिकार शक्ती वाढते.
त्रिसूत्री पाळा
आत्ता पर्यंत पाळत आलेली त्रिसूत्री अजूनही बराच काळ पाळणे अत्यंत आवश्यक आणि जरुरीचे आहे जसे की
मास्क घाला ,
सॅनिटायझर वापरा आणि
सोशल डिस्टन्सिंग ठेवा .
सकारात्मक राहा
ही वेळ पण जाईल . आपल्याला परत सुसंघटित आणि सुनियोजित होणे अत्यंत जरुरीचे आहे. आहेत्या परिस्थितून सावरून आपण पुढे जाणे गरजेचे आहे. पुढे चांगलेच होईल ही खूणगाठ मनाशी बांधून पुढचे पाऊल टाकावे.
मेडिक्लेम पॉलिसी घ्या ज्यांनी कोणी मेडिक्लेम- स्वतःचा आणि कुटुंबाचा केला नसेल तर तो करण्याची हीच ती वेळ आहे. मेडिकल ट्रीटमेंट खूप महाग होत चाललेली आहे त्यामुळे किमान ५ लाखांचा मेडिक्लेम असावा ही प्रांजळ अपेक्षा, त्याचा वर्षाचा प्रीमियम काही जास्त नाहीं.
परोपकारी वृत्ती ठेवा
जमेल तशी जमेल तेव्हा दुसऱ्याला मदद करा. कारण हा निसर्गाचा नियम आहे की जेव्हढे द्याल त्याच्या कित्येकपटीत परत मिळेल. चांगल्या हेतूने द्या, परत मिळण्याची अपेक्षा न करता द्या, निश्चित तुम्हाला त्याचा परतावा मिळेल.
अध्यात्माची जोड ठेवा आत्मपरीक्षण करा. ‘मी’ पणा सोडून जे होते आहे. ते त्याच्याच (भगवंताच्या) इच्छेने हे लक्षात ठेवा आणि मग मानसिक त्रास, चिडचिड, भडभड होण्याचे कारणच उरत नाही. त्याच्या म्हणजे ईश्वराच्या नावानी एक तरी माळ जपा म्हणजे मन शांत आणि समाधानी होईल.
आत्म-निर्भर व्हा !
म्हणणे खूप सोपे आहे पण आचरणात आणणे कठीण. मोदींजींनी आत्म-निर्भर भारताच्या नांदीचा शंख फुंकला आहे त्यामध्ये आपल्याला कसे योगदान देतायेईल याचा विचार करा. एखादा नवीन उद्योग की जो स्वबळावर, स्वकष्ठावर आणि लोकांना बरोबर घेऊन करता येईल ज्याच्या आपल्या देशाला आणि समाजाला उपयोग होईल असा सुरू करण्याकडे प्राधान्य ठेवा.
तर प्रियजनहो, आयुष्य खूप सुंदर आहे, या जन्माचे नक्कीच काहीतरी प्रयोजन आहे. कोरोना महामारी सारखी आणखीन बरीच संकटे येतील आणिक जातील ही, पण आपण पुढे जायच आहे.
“तुफान मे भी जलता रहे वह दिया बनो,
बरसात मैं सैलाब न लाये वह दारिया बनो,
हर हालत मैं हसते रेहेना, हांसके मुश्किल को भगाना, क्योंकि सहनशीलता से विकास होता हैं, ये कंबक्त कोरोना तो अभी आया हैं,
हमे खिले हुए तो बरसो बितें हैं!!
– डॉ. प्रसाद जोशी,
प्रसिद्ध अस्थीरोग शल्य-चिकित्सक,
जोशी हॉस्पिटल प्रा. ली.,
लक्ष्मी नगर, फलटण.