सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात उच्च न्यायालयाकडुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश; फलटणमध्ये भीम आर्मीकडुन जल्लोष

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. 06 जुलै 2025 । फलटण । पोलिस कोठडीत झालेल्या मृत प्रकरणी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश मिळाले आहे. हायकोर्टाने संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हा निकाल आदेश देशात कायद्या पुढे समानता, समता दर्शवतो हे पाहता भीम आर्मी संघटनेने फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जलोष केला आहे.

या प्रकरणामध्ये न्याय मिळवून देणारे बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व बहूजन समाजा कडून आभार यावेळी मानण्यात आले आहेत.

यावेळी फलटण येथे अजित संभाजी मोरे, लक्ष्मण काकडे, सुनील पवार, प्रतिक अहिवळे, कुणाल अहिवळे, आशुतोष डोईफोडे, गणेश सुर्यवंशी, मंगेश ननावरे, यश अवघडे, विजय भोंडवे, सुरज भैलुमे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!