दैनिक स्थैर्य | दि. २३ मे २०२३ | फलटण |
फलटणच्या श्रीराम जवाहर भागिदारी कारखान्याकडून आजपासून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी खतांचा बेसल डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा बेसल डोस खत वितरण शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
या बेसल डोसमध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांना एकरी दोन पोती युरिया, तीन पोती ९:२४:२४ किंवा चार पोती १०:२६:२६ व कॉम्बोपॅक मिळणार आहे. श्रीराम जवाहर भागिदारी कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांनी कारखान्याकडून उपलब्ध केलेल्या या बेसल डोसचा अधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.