बरड येथील महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ उत्साहात पार पडला; ज्ञाानासह मनोरंजनाचा अनोखा संगम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

बरडमधील शिवशंभो नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित ‘खेळ पैठणीचा, उत्साह आनंदाचा’ कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ज्ञान, खेळ आणि खिलाडूवृत्तीचा आनंद घेतला.

स्थैर्य, बरड, दि. ०५ ऑक्टोबर : महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांच्या चौकटीबाहेर त्यांना आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि स्वतःच्या कौशल्यांना वाव मिळावा, यासाठी बरड येथील शिवशंभो नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने ‘खेळ पैठणीचा, उत्साह आनंदाचा’ हा रंगारंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात गावोगावच्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन

‘खेळ पैठणीचा, उत्सव आनंदाचा, साज मराठमोळा, अभिमान महाराष्ट्राचा’ या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन समाज प्रबोधनकार महावीर भालेराव आणि व्याख्याते बाबासाहेब जगताप यांनी केले. तसेच सोमीनाथ घोरपडे आणि रामचंद्र मोरे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावरील प्रश्नमंजुषेने झाली.

विविध स्पर्धा आणि विजेत्यांची नावे

संगीताच्या तालावर घेण्यात आलेले ‘तळ्यात-मळ्यात’, दोऱ्याला बांधलेली मिरची बाटलीत टाकणे, मेणबत्ती विजवणे यांसारख्या गमतीदार खेळांनी कार्यक्रमात रंगत आणली. अंतिम फेरीतील विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: प्रथम क्रमांक विजेत्या विजया नवनाथ आवटे यांना मानाची पैठणी प्रदान करण्यात आली, द्वितीय क्रमांक सीमा शशिकांत आवटे (मिक्सर), तृतीय क्रमांक सायली बुद्धभूषण लोंढे (मिनी कुलर), चतुर्थ क्रमांक उज्ज्वला रमेश सावळकर (डिनर सेट) आणि पाचवा क्रमांक आरती सूरज आवटे (कुकर) यांना मिळाला. सर्व सहभागी स्पर्धकांना गिफ्ट हॅम्पर देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!