कर्ज घेतलेला प्लॅट परस्पर विकून बँकेची फसवणूक; वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । वाई । फ्लॅट खरेदीसाठी बँकेचे कर्ज घेऊन बँकेची परवानगी न घेता परस्पर फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीस विकून वीस लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी येथील गणेश दत्तात्रय सावंत यशवंतनगर याच्यावर वाई पोलीस ठाण्यात आयडीबीआय बँकेच्या व्यवस्थापकांनी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

१७ ऑक्टोबर २०१८ रोजी गणेश दत्तात्रय सावंत जगताप हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर वाई यांनी आयडीबीआय बँकेच्या कडून वीस लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर त्यांनी नियमित दोन हप्ते भरले. यानंतर हप्ते थकले. मात्र नंतर आयडीबीआय बँकेची परवानगी न घेता सावंत यांनी प्लॅट परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकला. यामुळे बँकेची वीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा बँकेचे व्यवस्थापक अतुल अशोक संकपाळ यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास वाई पोलीस करत आहे.


Back to top button
Don`t copy text!