बाळासाहेब माजगावकर यांचे निधन


 

स्थैर्य, सातारा, दि. ०४ : सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक आणि सहकार चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते दा. कृ. उर्फ बाळासाहेब माजगावकर (वय ८४) यांचे आज दुपारी चारच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी आहे.

सामाजिक कार्याची आवड असलेले दामोदर कृष्णाजी उर्फ बाळासाहेब माजगावकर हे सातारा शहरात अनेक सामाजिक व सार्वजनिक संस्थांशी संबंधित होते सातारा नगरपालिकेचे ते माजी नगरसेवक व काही समित्यांचे सभापती पदही त्यांनी भूषविले  आहे.  सातारच्या राजघराण्याची त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे.

 

सातारा शहरातील ज्येष्ठ अभ्यासू , विद्वान ,  हसरे व्यक्तिमत्व, म्हणुन दा. कृ. तथा बाळासाहेब माजगावकर यांना   ओळखले जात होते.

सहकार चळवळीचा व नागरी बँकिंगचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जनता सहकारी बँक , सातारचे ते अनेक वर्षे संचालक होते. चेअरमन पदही त्यांनी भूषविले आहे. सातारा जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे संस्थापक  अध्यक्ष मार्गदर्शक होते. महाराष्ट्र अर्बन बँक असोसिएशनचे ते संचालक व पदाधिकारी होते. 

सातारचे माजी नगरसेवक, आझाद हिंद मंडळाचे हितचिंतक, सातारा जिल्हा  रेशन दुकानदार  संघटनेचे  माजी अध्यक्ष, श्रीकृष्ण क्रीडा मंडळ सातारा चे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर गुरुवार चौकातील प्रकाश मंडळाचे ते मार्गदर्शक होते. खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील सिद्धेश्वर महादेव देव देवस्थान चे ते सरपंच होते. अनेक सहकारी संस्था उभ्या करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने सहकार चळवळीतील ,  नागरी बँक क्षेत्रातील मार्गदर्शक कार्यकर्ता हरपल्याचे बोलले जात आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!