दैनिक स्थैर्य | दि. २६ सप्टेंबर २०२३ | बारामती |
बारामती तालुक्यातील जैनकवाडीच्या उपसरपंचपदी बाळासाहेब भालेराव माने यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच संदीप शेंडे, सदस्या स्वाती गणेश काळे, धनश्री संतोष लोखंडे व सतीश लोखंडे, माजी सरपंच बाळासो माने, प्रकाश सूर्यवंशी, गणेश माने, संतोष लोखंडे, कल्पना ननवरे, नितीन माने, दत्तात्रय सूर्यवंशी, डॉ. गणेश काळे, बाळासाहेब माने, प्रशांत माने, राहुल माने, बाळासाहेब माने, कुंडलिक माने आदी मान्यवर उपस्थित होते.
जैनकवाडीच्या प्रत्येक नागरिकाला शासनाच्या विविध योजनांसाठी सहकार्य करू व विकास कामासाठी कटिबद्ध राहू, असे निवडीनंतर उपसरपंच बाळासाहेब माने यांनी सांगितले.