दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
हिंगणगाव (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी बजरंग निवृत्ती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
या निवडीवेळी सोसायटीचे चेअरमन सुरसिंग भोईटे, गजानन भोईटे, विकास भोईटे, राजेंद्र काकडे, जयदीप भोईटे, कपिल भोईटे, अजित सणस, नानासाहेब खरात, नवनाथ सुतार, लक्ष्मण बागडे, बोबडे, सुनीता भोईटे, सचिव हणमंत चव्हाण उपस्थित होते.
या निवडीबद्दल बजरंग शिंदे यांचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सरपंच संतोष भोईटे, पराग भोईटे, पद्मराज भोईटे यांनी अभिनंदन केले आहे.