• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महापुरुषांच्या आदर्श व विचारांचा जागर लोकशाही मजबुत करेल : राष्ट्रवादी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक राजेशिर्के

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 16, 2023
in फलटण
बैठकीत मार्गदर्शन करताना दिपक राजेशिर्के शेजारी मान्यवर, २) माजी सैनिक सेल पदाधिकारी यांच्या समवेत येथील माजी सैनिक व राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते.

बैठकीत मार्गदर्शन करताना दिपक राजेशिर्के शेजारी मान्यवर, २) माजी सैनिक सेल पदाधिकारी यांच्या समवेत येथील माजी सैनिक व राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते.


दैनिक स्थैर्य । दि. १६ मार्च २०२३ । फलटण । देशभर निर्माण झालेले दूषीत सामाजिक वातावरण बदलण्यासाठी महापुरुषांचे आदर्श आणि विचारांचा जागर करुन हे आदर्श आणि विचार समाजात अधिक खोलवर रुजवावेत, लोकशाही अधिक मजबुत व्हावी आणि सामाजिक वातावरणात पुन्हा सकारात्मकता निर्माण करण्याची आवश्यकता राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक राजेशिर्के यांनी स्पष्टपणे नमूद केली आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सैनिक सेल आयोजित राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेच्या स्वागत व प्रबोधन कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या फलटण येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल प्रदेशाध्यक्ष दिपक राजेशिर्के बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील ॲड. संभाजीराव मोहिते, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत आजमाने आणि तात्याराव मुंढे तसेच पोपटराव पडवळ, लक्ष्मण लोहार, दिलीप भिसे, दिलीप गंगावणे, चंद्रकांत गुंजवटे, रामचंद्र खिलारे, बाळासाहेब शिंदे, शंकर पखाले, प्रल्हाद काकडे वगैरे माजी सैनिक यांच्यासह फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर महाप्रबोधन यात्रा दि. ९ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातून सुरु झाली असून राज्यातील १५० तालुके आणि ३६ जिल्ह्यात २ महिने सलग प्रबोधन करुन दि. ९ एप्रिल रोजी खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात यात्रेचा समारोप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दिपक राजेशिर्के म्हणाले, आज लोकशाहीत आपल्याला बोलू दिले जात नाही, तर सामाजिक, घटनात्मक संस्थांचा गैरवापर करुन आपली तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, महापुरुषांचा अवमान करणे किंवा बोलू न देणे हे लोकशाहीवरील मोठे संकट आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक भाषा वापरण्याची एकप्रकारे चढाओढ सुरु झाली आहे, राज्यपाल यांच्या सारखी घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती, मंत्री किंवा अन्य उच्चपदस्थ महापुरुषांबद्दल अवमान कारक वक्तव्य करतात याचा अर्थ यामागे कुठेतरी षडयंत्र असल्याचा संशय येतो.

आपली लोकशाही संपवावी किंवा लोकशाहीला आणि आपल्या महापुरुषांना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करीत दिपक राजेशिर्के म्हणाले, हे षडयंत्र राज्यातील सर्वसामान्यांना समजावून देण्यासाठी राज्यातील साडे नऊ लाख माजी सैनिकांना एकत्र करुन जय जवान, जय किसान नारा देत पुन्हा एकदा सकारात्मकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. दिपक राजेशिर्के पुढे म्हणाले, खा. शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद ४ वेळा भूषविले, केंद्रात कृषी व संरक्षण मंत्री म्हणून काम केले त्यावेळी सातत्याने या देशातील आणि राज्यातील शेतकरी व सैनिकांचे प्रश्नांना प्राधान्य देवून ते सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, ज्या देशात शेतकरी व सैनिक समाधानी, चिंतामुक्त असतो त्या देशात सर्वसामान्य माणूसही सुखी समाधानी असतो. आज शेतकरी, सैनिक यांना दुर्लक्षित करण्यात येत आहे, त्यांची कुचंबणा केली जात आहे, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केल्याचा देखावा केला जात आहे. त्याच बरोबर महापुरुषांना बदनाम करुन, लोकशाही अडचणीत आणून सुरु असलेली दिशाभूल दूर करण्यासाठी महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न सुरु आहे.

दिपक राजेशिर्के पुढे म्हणाले, जय जवान, जय किसान चा नारा बुलंद करण्याची आवश्यकता आहे. समाजहित जपणारी, समाजासाठी काम करणारी मंडळी घटनात्मक तरतुदींमधून उभ्या राहिलेल्या संस्थांच्या माध्यमातून जेरबंद केली जातात आणि त्यांना डांबून ठेवून, बदनाम करण्याचा प्रयत्न होतो आणि पुन्हा तपास यंत्रणांना त्यांच्या विरोधात काहीच पुरावा सापडला नसल्याचे सांगण्यात येते हे दुर्दैवी असून त्याला छेद देण्यासाठी पुन्हा महापुरुषांचे आदर्श, त्यांच्या विचारांचा जागर आणि त्यातून योग्य समाज प्रबोधन हा या महाप्रबोधन यात्रेचा उद्देश आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील ॲड. संभाजीराव मोहिते यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्य कारभाराची अनेक उदाहरणे देत ते लोकहितकारी राजे होते. सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी, त्यांना उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मुधोजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय दिक्षीत यांनी सर्वांचा परिचय करुन दिल्यानंतर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने फलटण तालुक्यातील माजी सैनिकांच्या हस्ते शाल, श्रीफळ, भेट वस्तू देवून उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष जयकुमार इंगळे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शुभम नलवडे, फलटण शहर कार्याध्यक्ष अमोल भोईटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजीत निंबाळकर, नितीन मदने, श्रीधर कदम, राहुलभैय्या निंबाळकर, सोनवडी सरपंच सचिन सुर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.


Previous Post

फलटण तालुक्यात सर्व संघटना एकसंघ : सकारात्मक निर्णय होइपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची तयारी

Next Post

पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; १३ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

Next Post

पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा; १३ हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!