
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
जय भैरवनाथ सामाजिक संस्थेच्या वतीने दिल्या जाणार्या ‘समाज भूषण’ पुरस्काराने फलटण येथील अविनाश पवार यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रामध्ये अगदी उत्कृष्ट काम करणार्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. अविनाश पवार यांची कला क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे.
अविनाश पवार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्वच मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
