
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२२ । फलटण । फलटणचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरामध्ये राम नवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. आज म्हणजेच राम नवमीच्या दिवशी सकाळ पासून फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. श्री नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर देवस्थाने ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिरात दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. आज दुपारी ठीक १२ वाजता श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोस्तव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
