मल्हारपेठेत आजारी बिबट्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल!


 

स्थैर्य,कऱ्हाड, दि.२४ : मल्हारपेठ विभागातील गांधी टेकडी परिसरात निपचीत अवस्थेत सापडलेल्या दीड वर्षाच्या मादी बिबट्याला पर्यावरण अभ्यासकांसह वन्यजीव विभागाने वाचविण्याचे केलेले अथक परिश्रम अखेर असफल ठरले. तत्परतेने बिबट्यावर उपचार करण्यात आले. मात्र, न्यूमोनिया झालेल्या दीड वर्षाची मादी बिबट्याने दुपारी अखेर प्राण सोडले. त्यामुळे बिबट्याला वाचविण्याचे शर्तीच्या प्रयत्न असफल ठरल्याने अधिकारी, अभ्यासकांमध्ये निरूत्साह होता. सायंकाळी बिबट्यावर अत्यंसंस्कार झाले. 

मराठा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा : प्रकाश आंबेडकर

मलहारपेठ विभागातील गांधीटेकडी भागातील डोंगरी भागात बिबट्याचा वावर आहे. त्यापैकी एक बिबट्या निपचीप पडला होता. त्याची माहिती भागातील ग्रामस्थांनी वन्य जीव विभागाला दिली. वन विभागाचे व्ही. आर. काळे, पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे यांच्यासह व विभागाच्या पथकाने तेथे धाव घेतली. त्यावेळी गांधी टेकडीच्या झुडपात एक बिबट्या निपचीप पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्री. भाटे व अधिकाऱ्यांनी त्या बिबट्याला हलवून पाहिले. मात्र, त्याने काही प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याचा श्वासोश्वास चालू असल्याने त्याच्यात जीव होता. त्यांनी त्वरित त्याला पिंजऱ्यात बंद करून तो बिबट्या कऱ्हाडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणला. 

डॉ. हिंगमीरे, डॉ. सचिन गरूड, डॉ. परिहार यांनी बिबट्याची पहाणी केली. त्यावेळी त्यांच्या अंगात ताप होता. त्याने काहीतरी विषारी खाल्ले आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यांनी काही औषधे दिली. त्या बिबट्याला इंजेक्शन दिल्यानंतर त्याचा ताप कमीही झाला. त्याला तरतरी आली. बिबट्याला चोवीस तास निगरानी खाली ठेवण्याचे ठरले, त्यानुसार त्याला वराडे येथे हलविण्यात आले. बिबट्याची प्रकृती कसी राहणार यावर पुढील उपचार ठरणार होते. मात्र, दुपारी बिबट्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यात त्याला न्यूमोनिया झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे त्याचा ताप कमी येत नव्हता. त्यातच त्याचे निधन झाले. बिबट्या निपचीप पडला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर ज्या तत्परतेने पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे, वन विभागाचे व्ही. आर. काळे व त्यांच्या पथकाने बिबट्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, ते सारेच प्रयत्न असफल ठरले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!